पावसाचा वीट व्यावसायिकांना फटका
बेळगाव, प्रतिनिधी:
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बेळगाव आणि खानापूर तालुक्यात वळीवाच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. त्याचा फटका वीट व्यावसायिकांना बसला आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामासाठी लागणाऱ्या जळावू विटांचे उत्पादन घेतले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणावर वीट व्यावसायिकांकडून भट्टीची उभारणी करण्यात येते. भट्टी सुरू करून पहिल्यांदा विटांचा कच्चामाल बनवला जातो. त्यानंतर काही दिवसांनी कच्च्या मालापासून पक्की वीट बनवण्यात येते.https://dmedia24.com/the-27-year-old-youth-dies-after-falling-down-the-taste-of-the-mango-train/
या दरम्यान अचानक अवकाळी पाऊस झाल्यास वीट व्यावसायिकांचे नुकसान होते. मंगळवारी सायंकाळी अचानकपणे वळीवाने हजरी लावली. परिणामस्वरूप बेसावध असलेल्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गर्लगुंजी, अंकले, देसूर , गणेबैल, तोपिनकट्टी, इदलहोंड अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वीटभट्ट्यांची उभारणी करण्यात येते. पण अचानक आलेल्या वळीवाच्या पावसामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
या व्यवसायामध्ये व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. अचानकपणे हजेरी लावलेल्या वळीवामुळे त्यांची मेहनत व पैसा वाया जातो.