आरसीबी 7 विकेटनी विजयी
आयपीएलचे 18 वे पर्व
कोलकाता:
येथील स्टेडियमवर शनिवारी आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात खेळवण्यात आलेल्या उद्घाटनाच्या पहिल्या सामन्यांमध्ये आरसीबीने केकेआर चा सात विकेटने पराभव केला.
कलकत्ता ने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 20 षटकांमध्ये आठ बाद 174 धावा केल्या. केकेआर कडून अजिंक्य राहण्याने सर्वाधिक 56 धावा केल्या तर त्याला सुनील नरेन यांनी 44 आणि अंगक्रिश राघव यांनी 30 धावा करून चांगली साथ दिली. मात्र उर्वरित फलंदाज तग धरू शकले नाहीत. आरसीबी कडून कृणाल पांडेने सर्वाधिक तीन तर जोश हेजवूड यांनी दोन विकेट घेतल्या.
175 धावांचा पाठलाग करताना आरसीबी ने 16.2 षटकांमध्ये तीन गड्यांच्या बदल्यात 177 धावा करून सामना जिंकला. विराट कोहलीने चार खणखणीत चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 59, फिल् सॉल्ट यांनी 56 तर कर्णधार रजत पाटीदार यांनी 34 धावांचे योगदान दिले. लिविंग स्टोन 15 धावांवर नाबाद राहिला.
अशा पद्धतीने उद्घाटनाच्या पहिल्याच सामन्यात गत विजेत्या केकेआरचा आरसीबीने पराभव केला.