खानापूर रोडवरील गोवावेस सर्कल येथील पंचवटी मंदिरसमोर एअरटेल कंपनीच्या डक्टचे झाकण फुटल्यामुळे तेथील परिस्थिती धोकादायक झाली होती. या फुटकळ झाकणामुळे पादचारी आणि वाहनचालकांना रस्त्यावरून ये-जा करताना जीव धोकात टाकावा लागत होता.
या समस्येची माहिती वॉर्ड क्रमांक २९ चे नगरसेवक नितीन ना. जाधव यांना लागताच त्यांनी तातडीने कार्यवाही करून एअरटेलचे अधिकारी आणि महानगरपालिकेच्या प्रतिनिधींना ठिकाणी बोलावून घेतले. त्यांनी स्वत: रात्री एक वाजेपर्यंत ठिकाणी उपस्थित राहून दुरुस्तीचे काम देखरेखीसह पूर्ण करून घेतले.
या प्रक्रियेदरम्यान एअरटेल कंपनीचे गंगाधर तूरमुंडे यांसह इतर अधिकारीही हजर होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या या तत्पर कार्यवाहीबद्दल नगरसेवक नितीन जाधव यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा करण्यात येत आहे.*सीमाभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वैद्यकीय शिबिराला प्रतिसाद*