मराठा सेंटरमध्ये शिस्तबद्धरीत्या होळी साजरी
बेळगावातील मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये पारंपरिक पद्धतीने शिस्तबद्धरित्या होळी साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या होळी कार्यक्रमाला अधिकारी, जवान आणि प्रशिक्षणार्थी जवान उपस्थित होते. मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले.
रांगोळी काढून होळीची लाकडे रचण्यात आली होती. मंत्रपठण झाल्यावर ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.होळी पेटवण्यात आल्यावर होळीच्या भोंवती रिंगण करून उपस्थितानी गोल फिरत शंखनाद केला. होळी पुजानाचे पौरोहित्य पंडित श्रीकृष्ण पाठक यांनी केले. यावेळी उपस्थितानी एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देऊन जल्लोष केला.सीमाकवी रवींद्र पाटील यांचा श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स परिवाराकडून विशेष सत्कार