चंदगड (प्रतिनिधी) – राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक आणि सीमाकवी रवींद्र पाटील यांचा श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स परिवाराकडून विशेष सत्कार करण्यात आला.
त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या “विशेष नवोपक्रम सन्मान” पुरस्काराच्या निमित्ताने हा गौरव करण्यात आला.
यावेळी श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स, चंदगड शाखेचे अधिकारी किरण कोडोली आणि कर्मचारी मनोज गावडे यांनी मुख्याध्यापक एन. टी. भाटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शुभेच्छा पत्र देऊन पाटील सरांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. टी. भाटे, तानाजी पाटील, सदाशिव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठी साहित्य, शिक्षण आणि समाजसेवेत महत्त्वपूर्ण योगदान
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, नवोपक्रमशील उपक्रमांची अंमलबजावणी करणारे आणि सीमाभागात मराठी भाषा-संस्कृतीचे संवर्धन करणारे व्यक्तिमत्व म्हणून रवींद्र पाटील ओळखले जातात.
तसेच, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली येथे निमंत्रित कवी म्हणून, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कर्नाटक राज्याध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य लक्षणीय आहे. त्यांच्या या सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक योगदानाची दखल घेत श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स परिवाराने त्यांचा विशेष सत्कार केला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी शुभेच्छा पत्र पाठवून पाटील सरांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
या सन्मानप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना रवींद्र पाटील म्हणाले,
“श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स ही संस्था सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याशी बांधिलकी जपणारी अग्रगण्य संस्था आहे. अशा संस्थांकडून होत असलेला सन्मान निश्चितच प्रेरणादायी आहे.”
या सन्मानामुळे रवींद्र पाटील सरांच्या कार्याचा नवा गौरव झाला असून, त्यांच्या पुढील सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे.