॥ कंग्राळीत अतिक्रमणा विरोधात सागर नगर मधील नागरीकांचा रास्ता रोको ॥
एपीएमसी पोलीसांच्या सल्ल्यानुसार रास्तारोको मागे
कंग्राळी खुर्द – या गावातील सागर नगर भागातील नागरिकांना ज्योतिर्लिंग गल्लीत अतिक्रमण करून बांधकाम होत असल्याचा आरोप करत मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करून आंदोलन छेडले . एपीएमसी पोलीस ठाण्यातीत कर्मचार्यांनी हस्तक्षेप करून रास्ता रोको आंदोलकांना चर्चेसाठी पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन वाहतुक सुरळीत केली .
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या गावातील सागरनगर भागातील ज्योर्तिलीग गल्लीत जाणारा रस्ता केवळ पाच फुट असून त्यावरही एक घरमालक अतिक्रमण करून बांधकाम करत आहे असा आरोप करत बांधकाम बंद करण्यास सांगितले . तसेच याबाबत त्या नागरीकांनी ग्रापला यापुर्वीच निवेदन देऊन संपूर्ण माहिती दिली होती असे त्यांचे म्हणणे होते . . परंतू ग्रामपंचायत तीची कोणतीही परवानगी नसतांना संबंधीत व्यक्तीने अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले होते . परिसरातील नागरिकांनी अडवणूक केली असता त्यांनी न ऐकता काम सुरूच ठेवले त्यामुळे थोडी वादावादीही झाली परंतू संबधीत घर मालक ऐकतच नसलेने नागरीकांनी मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करून आंदोलन छेडले घटनास्थळी ग्राप सदस्य प्रशांत पाटील ,यांनी भेट देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही ही बातमी एपीएमसी पोलीस ठाण्यात गेली .https://dmedia24.com/when-to-solve-the-problem-of-garbage-on-ganeshpur-road/
लागलीच ए एस आय विलास बाबन्नावर व त्यांचे सहकारी येऊन सर्व आंदोलकांना तसेच संबंधीत व्यक्तीला कायदा हातात घेऊ नका असा सल्ला देत सर्वाना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले . चर्चा केली तोडगा निघाला नाही कारण सद्या ग्राप सदस्य प्रयागराजला गेले असून ते दोन दिवसांत येतील त्यानंतर नियमाच्या चौकटीत तोडगा काढण्याचा सल्ला पोलीसांनी दिला असून तो पर्यंत कोणतेही बांधकाम न करण्याच्या तसेच रास्ता रोको न करण्याच्या सूचना दिल्या . व प्रकरण तात्पुरते शमवले . या रास्ता आंदोलनात स्मिता कालकुंद्रीकर , वंदना होनगेकर , यल्लू पाटील अर्चना घाटकर सुरेखा घाटकर विद्या धाडवे शांता घाटकर सुरेखा पानकर पावना सांडील रूपा खराडे श्री नाईक यांचेसह परिसरातील नागरीक सहभाग घेतला https://youtube.com/shorts/NK_SkhXCMto?si=WzPPPtapfnXb_AeT
* या रस्त्या सदर्भात ग्राप ला निवेदन आले आहे गेल्या 10 – 12 वर्षीपासून हा प्रश्न प्रलंबीत आहे . नोटीसा देऊनही लोक मानत नाहीत . पंचापतीचे अधिकार वापरून बेकायदेशीर ठिकाणी
* आता धडक कारवाई शिवाय पर्याय नाही . प्रशांत पाटील ग्राप सदस्य