**एसएसएलसी विद्यार्थ्यांकरिता आमदारांकडून प्रेरणादायी संदेश**
बेळगांव:दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळा प्राचार्यां मार्फत प्रेरणादायी संदेश पाठवून, आमदार असिफ (राजू) सेठ यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रतेने आणि आत्मविश्वासाने परीक्षेचा सामना करण्याचा आवाहन केले आहे. परीक्षेच्या तणावाची जाणीव असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना निश्चयी आणि सकारात्मक विचारांसह परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला दिला.
त्यांनी शाळा प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचेही आभार मानले, जे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मार्गदर्शन आणि पाठबळ प्रदान करतात.
या उपक्रमाला शाळा प्राचार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमदार यांनी विद्यार्थ्यांच्या मनोबल वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना त्यांनी या पाठपुराव्याचे स्वागत केले. पालक आणि विद्यार्थ्यांनीही या प्रयत्नांचे आभार मानले, अशा प्रेरणादायी संदेशामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी होतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे त्यांनी सांगितले. https://dmedia24.com/roko-road-to-demand-a-jammers-intensity/
एसएसएलसी परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याने, आमदार असिफ (राजू) सेठ यांचा हा संदेश विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करून यश मिळवण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला आहे.