प्रेयसीला मारून स्वतः केली आत्महत्या
बेळगांव:विवाहाला विरोध केल्याने प्रियकराने प्रेयसीला भोसकून स्वतःलाही भोसकून घेतल्याची घटना बेळगावातील नवी गल्ली येथे घडली आहे. येळ्ळूर येथील प्रशांत कुंडेकर (२९) आणि ईश्वर्या लोहार यांचे गेल्या दीड वर्षांपासून प्रेम होते. प्रशांत याने ऐश्वर्याच्या आईशी लग्न करण्या संबंधी चर्चा केली होती. तिच्या आईने तू आणखी थोडे पैसे कमव मग लग्न लावून देते असे सांगितले होते.
ऐश्वर्या आपल्या मावशीच्या घरी आली असताना प्रशांत देखील तेथे गेला आणि त्याने पुन्हा लग्नाचा विषय काढला. यावेळी प्रशांत याने चाकू काढून ऐश्वर्याला भोसकले आणि स्वतःवर देखील चाकूचे वार करून घेऊन स्वतःला संपवले. या घटनेमुळे शहरात डबल मर्डर झाल्याची उलटसुलट चर्चा सुरु होती. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मारब्यांग यांनी घटनास्थळी भेट दिली.