*राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन*
बेळगाव: मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनात पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी १५०हून अधिक विज्ञान प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि प्रयोगांनी सर्वांचे मन मोहित केले.
https://dmedia24.com/malabar-gold-and-diamonds-belgaum-distributed-rs/
मराठा मंडळ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या अध्यक्ष डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर) यांनी या प्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात नवनवीन कल्पना घेऊन पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी विज्ञानाच्या महत्त्वावर भर देत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
शाळेच्या प्राचार्य गायत्री आर. सुर्यवंशी यांनी विज्ञान विभागाच्या शिक्षक पल्लवी नेसरीकर, तेजस्विनी पाटील, ऐश्वर्या कुलकर्णी आणि इतर विज्ञान शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे मनोभावे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या अभ्यासात आणि प्रयोगांमध्ये अधिक रस घेण्यासाठी प्रेरणा दिली.
या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची जिज्ञासा आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याची प्रवृत्ती वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करून त्यांना पुढील आयुष्यात विज्ञान क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.