६ वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन ६ एप्रिलला होणार
बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन येत्या ६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाच्या आयोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत ही तारीख निश्चित करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे संमेलन मराठा मंदिर, बेळगाव येथे पार पडणार आहे.
या बैठकीस परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी संमेलनाबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. सुधीर चव्हाण (जिल्हाध्यक्ष, बेळगाव) होते. उपाध्यक्ष डी. बी. पाटील, सचिव रणजीत चौगुले, तसेच महिला कार्यकारिणीच्या जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे-पाटील आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बैठक डी बी पाटील फोटो स्टुडिओ येथे पार पडली.
संमेलन तीन सत्रांमध्ये असणार आहे .पहिले सत्र – उद्घाटन व प्रमुख भाषण, दुसरे सत्र – व्याख्यान व प्रबोधनपर चर्चा, तिसरे सत्र – जागर लोकसंस्कृतीचा (कलाकारांच्या सहभागाने)
यावेळी शिवसंत संजय मोरे, एम. के. पाटील, मुख्याध्यापक मोहन अष्टेकर, सुरज कणबरकर, एम . वाय . घाडी ,संदीप तरळे , गणेश दड्डीकर , स्वप्नील जोगानी,प्रा. मनिषा नाडगौडा, रोशनी हुंद्रे , स्मिता किल्लेकर ,सविता वेसने,नेत्रा मेणसे, शीतल पाटील यांनीही आपले विचार मांडले.
बैठकीचे प्रास्ताविक रणजीत चौगुले यांनी केले, तर डी. बी. पाटील यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण यांनी लोकवर्गणीतून संमेलन आयोजित करून भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी संपूर्ण बेळगावकरांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी वाचन चळवळ रुजवणे आवश्यक असून, या संमेलनाच्या माध्यमातून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.https://dmedia24.com/dalit-conflict-committee-ambedkar-dispute-flag/
बेळगाव सीमाभागातील साहित्य चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.