अनुष्का राजीव पाटील हिने मिस बेळगाव हा किताब केला प्राप्त
सुंडी तालुका चंदगड येथील कुमारी अनुष्का राजीव पाटील सध्या राहणार हिंडलगा हिने जीवन संघर्ष फाउंडेशन व नील क्रिएशन तर्फे घेतलेल्या फॅशन वीक मध्ये पहिल्या फेरीत कनिष्ठ गटात मिस बेळगाव हा किताब प्राप्त केला. चित्रपट निर्माते डॉ गणपत पाटील, श्री आर्थोचे अध्यक्ष डॉ देवेगोंडा आय,भाजप नेते विनय कदम,डॉ ज्ञानेश मोरकर व मान्यवर यांच्या हस्ते किताब प्रदान करण्यात आला. यासाठी तिला वडील राजीव पाटील आई सौ प्रिया पाटील,भाऊ रोहित यांचे मार्गदर्शन लाभले.
जिस्मो का है ये जलवा किस्मों का है ये जलवा शोहरत भी दे ये जलवा मकसद भी है ये जलवा माझ्यासाठी ही स्पर्धा एक केवळ स्पर्धा नसून ती स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी होती. हा विजय माझ्यासाठी खरा विजय हा आहे की माझ्या आईने शिवलेला ड्रेस मी इथे घालून सादर केला.माझी आई नेहमी म्हणते की परिश्रम आणि कल्पनाशक्ती जर एकत्र आली. तर साधा कपडा देखील एक उत्तम कलाकृती बनू शकते आणि तिने आपल्या या मला शिवलेल्या ड्रेस मधून दाखवला आहे. ट्रेडिशनल ड्रेस तिने स्वतःच्या लग्नाच्या साडीपासून बनवला त्यात खूप साऱ्या गोड आठवणी आहेत आणि हा ड्रेस सुद्धा तिने खूप मेहनतीने खूप प्रेमाने बनवलेला आहे.तर या माझ्या विजयाचं सगळं श्रेय माझ्या आईला जातं आणि इथे मला सादर होण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांना यांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद तिने मानले.