*मराठा मंडळच्या खानापूर येथे स्पोर्ट्स ट्रॅक चे उद्घघाटन साई स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण*
बेळगाव मधील प्रसिध्द शिक्षण संस्था मराठा मंडळ खानापुर तालुका व साई स्पोर्ट्स तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी नवीन स्केटिंग रिंक, क्रिकेट फुटबॉल टर्फ ग्राउंड,टेबल टेनिस, खो खो व कबड्डी अशा विविध ग्राउंड चे उद्घघाटन करण्यात आले.मराठा मंडळच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांच्या मार्गर्शनाखाली खानापूर तालुक्यातील गोर गरीब व होतकरू व इतर सर्वांना या खेळांचा उपयोग व्हावा व खानापुर तालुक्यातील खेळाडू देश विदेशा मध्ये चमकावे म्हणून या सर्व ग्राउंडची निर्मिती कऱण्यात आली आहे.https://dmedia24.com/the-transfer-of-that-place-to-the-pro-hindu-organization-at-nipani/
या ग्राउंड चे उद्घघाटन खानापुर चे आमदार श्री विठ्ठल हलगेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी सर्व खेळाडूना मार्गदर्शन केले आणि जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यानी खेळामध्ये सहभाग घेऊन फिट राहून उत्तम आरोग्यसाठी आणि आपले भविष्य उज्वल करण्यासाठीं शुभेच्छा दिल्या यावेळी मराठा मंडळ च्या अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजू , सुधीर हलगेकर, संयोगिता हलगेकर, युवा नेते जयराज हलगेकर, जयवंत जाधव,संदीप जाधव,साई स्पोर्ट्स चे संचालक प्रसाद जाधव, राजलक्ष्मी जाधव, स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर,आणि इतर मान्यवर उपस्थित होते. https://www.instagram.com/reel/DGmqv7EhhT9/?igsh=MTZhcGpvdTc3bGpqOQ==
*स्पोर्ट्स ट्रॅक ची वैशिष्ट्ये*
सुमारे 80000 हजार स्वेकर फूट असणारे नॉर्थ कर्नाटकातील मोठे आणि राऊंड शेप मध्ये असलेले सुसज्ज असे क्रिकेट व फुटबॉल खेळण्यासाठी उपयुक्त असे, सर्व बाजूनी फोकस लाईट आत्याधूनिक टर्फ ग्राउंड त्याचाच बाजूला 125 मीटरचे स्केटिंग ट्रॅक, बाजूलाच क्रिकेट नेट प्रॅक्टीस टर्फ ग्राउंड, कबड्डी व खो खो खेळण्यासाठी नवीन पद्धतीचे टर्फ ट्रॅक तसेच इनडोअर गेम मध्ये चेस, टेबल टेनिस व इतर खेळासाठी हॉल तयार केला आहे, खेळाडू ना चेजिंग रूम्स टॉयलेट बाथरूम व कॅन्टीन सुविधा या स्पोर्ट्स ट्रॅकवर उपलब्ध आहे याचा सर्व खानापुरातील व इतर भागातील खेळाडूंनी लाभ घ्यावा.
तसेच या कार्यक्रम प्रसंगी स्केटिंग, क्रिकेट व फुटबॉलचे प्रशिक्षक योगेश कुलकर्णी, विनय नाईक,तेजस पवार , ऋषीकेश पसारे,गणेश दड्डीकर, विठ्ठल गंगणे, राज कदम, सोहम हिंडलगेकर या सर्वाचा पुष्गुच्छ देवून गौरविण्यात आले यावेळी बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स,पालक व मराठा मंडळ शाळेचे विद्यार्थी, संचालक, शिक्षक व साई स्पोर्ट्स चे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते