*त्या जागेच्या हस्तांतरणास निपाणी येथील हिंदुत्ववादी संघटनाचा आक्षेप*
निवेदन देताना हिंदुत्ववादी कार्यकर्ते व प्रमुख
निपाणी नगरपालिकेच्या हद्दीतील 44 F मधील जागा सर्व धर्मीयांसाठी राखीव असताना सदर जगा इस्लाम असोसिएशनला देण्याचा घाट नगरपालिका प्रशासन घालत आहे त्याला हिंदुत्ववादी संघटनेने आक्षेप घेतला असून या संदर्भातील निवेदन मंगळवारी दिनांक 25 रोजी नगराध्यक्ष सोनल कोठडीया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर यांना देण्यात आले.
निवेदनात सदर जागा सर्वांसाठीच राखीव असताना ठराविक धर्माच्या संस्थेला देऊन धर्मांधतेला दिला खत पाणी घालण्याचे प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे 2017 साली मतांच्या लागून चालण्यासाठी ही जागा सदर संस्थेला देण्याचा ठराव , नागरिकांना विश्वासात न घेता झाला होता सदर राखीव जागेत सर्वांसाठी उपयुक्त अशी बाग, वाचनालय, व्यायाम शाळा, गोशाळा, बांधण्यासाठी प्रयत्न केल्यास त्याचा सर्वांना लाभ मिळेल तरी सदर जागा देण्याचा ठराव विशेष सभा घेऊन रद्द करावा ,अन्यथा त्याचे तीव्र प्रसाद उमटून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी बजरंग दल चे अजित पारळे. , अतीश चव्हाण, हिंदू जनजागृती समितीचे अनिल बुडके, विशाल जाधव, श्रीराम सेना कर्नाटकचे बबन निर्मले, अमोल चेंडके, हिंदू हेल्पलाइन चे सागर श्रीखंडे, जयदत्त काळे, प्रशांत घोडके, अक्षय वाघेला, शैलेश बिलुगुडे, आरएसएस चे सुमेध देशपांडे ,विशाल जोरापुरे, संजय केसरकर ,राहुल वाघेला, सुनील तीप्पे ,सागर राऊत, विश्वजीत शिंदे, प्रवीण सूर्यवंशी, महेश शिंदे, यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते निवेदन देताना छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.