कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी रोहिणी नाथबुवा यांची निवड https://dmedia24.com/admission-to-the-final-camp-division-of-camp-division/
बेळगाव:तालुक्यातील कंगराळी बुद्रुक ग्रामपंचायतच्या नूतन नूतन अध्यक्षपदी रोहिणी नाथ बुवा यांची करण्यात आली. काही दिवसांपूर्वी कंग्राळी बुद्रुक गावचा विकास होत नसल्याने ग्रामपंचायत अध्यक्षा कैसर बंदेनवाज सय्यद यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता.
सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नूतन अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत अध्यक्ष पदासाठी तिघांनी अर्ज केला होता त्यामध्ये रोहिणीनाथ बुवा यांनी १८ मते मिळवून विजय प्राप्त केला. तर रत्ना हनप्पांनावर यांना ९ मते, सुप्रिया कोळी यांना ७ मते मिळाली.
कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच गौंडवाड गावाला ग्रामपंचायत अध्यक्ष पद मिळाले आहे.
https://www.facebook.com/share/v/12DeCjXnXzF/