बेळगांव:शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी भटकी जनावरे फिरत आहेत. शहरातील नरगुंदकर भावे चौक परिसरात जखमी गाय असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते कडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन सामाजिक व गो रक्षक कार्यकर्त्याच्या वतीने सदर गायीला उपचार करून के.के. कोप येथील गो-शाळेत दाखल करण्यात आले. भटक्म या जनावरांची संख्या वाढल्याने अशा घटना वारनवार होत आहेत.https://dmedia24.com/free-medical-examination-camp-by-asif-raju-sheth-foundation/
पशुसंगोपन विभागाच्या डॉक्टरांकडुन सदर गायीच्या पायाला जखम झाल्याचे निदर्शनास आले. तात्काळ त्या गायीला महापालिकेच्या वाहनातून के.के.कोप येथील गो-शाळेत आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱयांना सूचना देऊन उपचार करण्याची विनंती यावेळी करण्यात आली. यावेळी गो रक्षक निलेश हिरेहॉली, पंकज जाधव, अवधूत तुडवेकर, राजू शंकानावर आदी यावेळी उपस्थित होते.