आसिफ (राजू ) शेठ फाउंडेशन तर्फे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर
बेळगाव:आसिफ (राजू ) शेठ फाउंडेशनच्या वतीने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खंजर गल्ली मुलींची सरकारी शाळा,रुक्मिणी नगर सरकारी शाळा,रामतीर्थ नगर सरकारी शाळा, अजमनगर उर्दू शाळा, अशोक नगर सरकारी शाळेमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. https://youtu.be/y9vTJkB0vnk?si=pyMmm2IyzwiqHdZ-
या वैद्यकीय तपासणी शिबिरामध्ये बीपी,ब्लड शुगर, अशा अनेक आजारांवरील औषधेही मोफत देण्यात आले
यावेळी उत्तरचे आमदार राजू शेठ बोलताना म्हणाले की प्रत्येकानी निरोगी राहणे गरजेचे आहे. सध्याच्या स्थितीमध्ये नागरिकांना अनेक आजार होत आहेत. त्याची पूर्व खबरदारी म्हणून आज आम्ही मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. https://dmedia24.com/elephant-rakskop-darshan-on-sunday-in-the-reservoir-area/
याप्रसंगी युवा नेते अमन शेठ, तसेच आसिफ शेठ फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वैद्यकीय तपासणी शिबिराचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला.