राजधानी दिल्लीत सीमाबांधवांनी सीमाप्रश्नाकडे
लक्ष वेधले
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत गेलेल्या मराठी बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली खानापूर आणि बेळगाव येथील समिती कार्यकर्ते नवी दिल्लीत साहित्य संमेलन स्थळी पोचले असून तेथे ते सिमवासियांच्या व्यथा व्यक्त केल्या.
महाराष्ट्र शासनाने २००४ साली सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. या दाव्याच्या कामकाजाला गती द्यावी. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सीमाप्रश्नाची धग महाराष्ट्र आणि देशव्यापी करावी. अखिल भारतीय साहित्य संमेलनात केंद्र शासनाने बेळगाव सीमाभाग तात्काळ महाराष्ट्रात सामील करावा असा ठराव मांडावा असे आवाहन करण्यात येणार आहे.समिती कार्यकर्त्यांनी दिल्लीतील मराठी नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना निवेदन सादर करणार आहेत.