जायंटस तर्फे अंधशाळेसाठी ब्लूटूथ साउंड बॉक्स आणि माईक ची देणगी.
जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या वतीने मंगळवार दिनांक 18.2.2025 रोजी विजय नगर बेळगाव येथील समृद्ध फाउंडेशन संचलित अंधशाळेंच्या मुलांकरता अन ते चालवीत असलेल्या ऑर्केस्ट्रा करिता सहाय्य म्हणून एक ब्लूटूथ साऊंड बॉक्स आणि दोन माईक ही उपयोगी उपकरणे देणगी दाखल च्या स्वरूपात जायन्टस ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या वतीने समृद्ध फाउंडेशन संचलित अंधशाळेला फेडरेशन सिक्स कर्नाटकाचे युनिट डायरेक्टर श्री शिवकुमार हिरेमठ व जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेन चे अध्यक्ष श्री यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी श्री शिवकुमार हिरेमठ तसेच जायंटस अध्यक्ष श्री यल्लाप्पा पाटील यांनी अंधशाळेतील मुलांचा गौरव केला. अपंग असूनही ते चालवीत असलेल्या ऑर्केस्ट्रा, तसेच अन्य विविध व्यवसायिक कार्यांचा त्यांनी विशेष रूपाने स्तुती करून त्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांचे मनोबल वाढवले. जॉईंटसचे खजिनदार श्री मधु बेळगावकर यांनी समृद्ध फाउंडेशनचे अध्यक्ष श्री शिवन गोडा पाटील यांनी अंधशाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्यात मोलाचा वाटा उचलला याबद्दल त्यांची स्तुती केली. याप्रसंगी जाइंटसचे उपाध्यक्ष श्री अरुण काळे, सेक्रेटरी श्री मुकुंद महागावकर, संचालक श्री प्रदीप चव्हाण, राहुल बेलवलकर, वाय न पाटील, भास्कर कदम, आनंद कुलकर्णी, अशोक हलगेकर अविनाश पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्री अरुण काळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी तसेच देणगी दाखील अर्थ सहाय्य करण्यास श्री शिवकुमार हिरेमठ यांचे खूपच सहाय्य झाले.