बेळगांव:सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कणबर्गी येथे रविवार दिनांक ९/२/२०२५ रोजी शाळेच्या सण १९९९-२००० बॅचच्या इयत्ता सातवीच्या माजी विद्यार्थ्यांचा २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवंदना व स्नेहमेळावा रोप्य महोत्सवी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पारhttps://dmedia24.com/an-unidentified-person-found-in-the-fort-pond/ पडला.
सदर बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचच्या पूर्ण शिक्षक आणि इयत्ता दहावी बॅचच्या वर्ग शिक्षकांचे व उपस्थितत सर्व आजी-माजी शिक्षकांचे स्वागत फुलांच्या उधळनिने केले.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी शाळेच्या विद्यार्थिनींच्या स्वागत व इशस्तवनाने झाली. सरस्वती देवीच्या फोटोचे पूजन व दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यावेळच्या वर्ग शिक्षिका सुजाता लोखंडे व वंदना गावडे टीचर शाळेचे मुख्याध्यापक श्री मोहन अष्टेकर त्याचबरोबर शाळेचे व हायस्कूलचे सर्व शिक्षक व माजी शिक्षक यांचा शाल,श्रीफळ,स्वेटर व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. https://youtube.com/shorts/47P9Ybhhzgk?si=NQ8WMgdP-jqzBQK8
त्याचबरोबर सदर बॅचचे माजी विद्यार्थी प्रशांत काळे आणि शुभांगी मुदगेकर यांचाही शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. सदर बॅचच्या वर्गशिक्षिका श्रीमती सुजाता लोखंडे,वंदना गावडे शाळेचे मुख्याध्यापक श्री के.वी पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री मनोहर अष्टेकर हक्की सर ,श्रीमती आस्मा नाईक, तळवार सर ,धाडी सर, पवार सर ,एसडीएमसी अध्यक्ष किशन सुठंकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर सदर बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले आणि पुन्हा ते बालपणीचे दिवस आठविल्याचे सांगितले. सदर १९९९-२००० बॅचच्या सातवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी शाळा कणबर्गी स्मार्ट टी.व्ही आणि हायस्कूलला प्रोजेक्टर स्क्रीन भेट दाखल दिली. त्यांचा स्वीकार किशन सुठंकर, एसडीएमसी अध्यक्ष आणि के.वी पाटील शाळेचे मुख्याध्यापक त्याचबरोबर मनोहर अष्टेकर हायस्कूल मुख्याध्यापक व उपस्थित सर्व शाळेच्या शिक्षकांनी केला.
शाळेला भेटवस्तू दिल्याबद्दल मुख्याध्यापक के.वी पाटील यांनी सदर बॅचचे कौतुक करून गुरुदक्षिणा शाळेला दिल्याबद्दल आभार मानले.
त्यानंतर १९९९-२००० इयत्ता सातवीच्या बॅचच्या वर्गशिक्षिका कडून माजी विद्यार्थ्यांना रिटर्न गिफ्ट व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर सदर बॅचच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा वर्ग भरून वर्गशिक्षिका गावडे टीचर व लोखंडे टीचर कडून छडीचे मार खाऊन शाळा भरली व पुन्हा ते जुने बालपणीचे दिवस आठवले.
सदर कार्यक्रमाला उपस्थित सर्वांच्या भोजनाची व्यवस्था सौ शुभांगी मुतगेकर व सातवीच्या माजी विद्यार्थ्यांनी हीने केली.
या कार्यक्रमाला एसडीएमसीचे अध्यक्ष किसन सुठंकर अध्यक्ष म्हणून लाभले शाळेचे मुख्याध्यापक के.वी.पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक मनोहर आष्टीकर वर्गशिक्षिका श्रीमती सुजाता लोखंडे,वंदना गावडे आस्मा नाईक, वारनोळकर यांनी सुभाष शिरोळ, भोसले तलवार, आर.एल पावशे ,बि.एल. अनवेकर, यांच्यासहित सन १९९९ ते २००२ सालच्या माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.