म्हापसा : म्हापसा येथे रविवारी 2 फेब्रुवारी 2025 रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कराटे चषक स्पर्धा पार पाडल्या. या स्पर्धेत बेळगांवच्या डायनॅमिक शोटोकान कराटे-डू(DSKI) च्या 65 कराटे पटूंनी भाग घेतला होता. यामध्ये बऱ्याच जणांनी उत्तम प्रदर्शन करून विजय संपादन केले.
यामध्ये काता आणि कुमिते या प्रकारामध्ये 26 सुवर्ण पदके, 20 रौप्य पदके आणि 28 कांस्य पदके पटकावलेली आहेत आणि यांचा सत्कार समारंभ रविवार 9 फेब्रुवारी 2025 रोजी कंग्राळी खुर्द येथे पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. जयराम पाटील (ग्रामपंचायत सदस्य कंग्राळी बी.के), श्री. प्रशांत पवार (पत्रकार, कंग्राळी बी.के), श्री. दीपक सुतार (Dmedia संपादक), सौ. मिनाक्षी मुतगेकर (SDMC सदस्य, कंग्राळी kH), श्री. बसवराज मलकन्नावर (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते.
याना श्री. मल्लेश चौगुले (अध्यक्ष DSKI), शिहान. नागेश पाटील(मुख्य प्रशिक्षक), सेन्सेई. मितेश निलजकर, सेन्सेई. करण पाटील, सेन्सेई. गौरव पाटील, सेन्सेई. रश्मी, सेन्सेई. विघ्नेश बालेकुंद्री आणि सेन्सेई. मनीषा पाटील यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.