चलवेनहट्टीत उद्या इगळ्या उत्सव
चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग देवस्थानच्या इंगळ्या उत्सव उद्या बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहेत
यावेळी या उत्सवात सुरवातीला भाविकांच्या उपस्थितीत देवांची पालखीतून मंदिरला प्रदक्षिणा घातल्या जातात यावेळी भाविक मोठ्या संख्येने पालखीतून आलेल्या देवाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात त्यानंतर ब्रम्हलिंग देव गादीवर विराजमान झाल्यानंतर नवस बोलल्या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात श्रीफळांचा वर्षाव करण्यात येतो.
यानंतर गाऱ्हाणे घातल्यानंतर मुंख्य उत्सवाला म्हणजेच इंगळ्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या उत्सवाचा लाभ घेत असतात त्याच प्रमाणे यावर्षी ही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी या उत्सवाला उपस्थित राहावे असे आवाहन ब्रम्हलिंग देवस्थान कमिटीने तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.