*राजहंसगड किल्लावर स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार*
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे राजहंसगड किल्यावर स्केटिंग स्पर्ध्या आयोजित करण्यात आली होती फिट इंडिया स्ट्राँग इंडिया अंतर्गत ही स्पर्धा स्केटिंग करत गड चढणे अशी 2 किलोमीटर अंतर पार करून घेण्यात आली या स्पर्धेत बेळगाव जिल्हातिल 60 च्या वर टॉप स्केटर्सनी सहभाग घेतला होता
या स्पर्धेचे उद्घघाटन सुळगा ग्रामपंचायत सदस्य श्री अरविंद पाटील यांच्या शुभ हस्ते झाले व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ समाजसेवक श्री गोविंद टक्केकर यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी श्री अभिमन्यू दागा, श्री जोतिबा नरवाडे ज्ञानेश्वर नरवाडे,
सुर्यकांत हिंडलगेकर,श्री गणेश दड्डीकर महादेव पवार, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स, पालक व राजहंस गडावरील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आकर्षक मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
*विजेत्या स्केटर्स पुढीप्रमाणे*
सौरभ साळोखे – प्रथम, अवनिष कामनंवर – दुसरा,श्री रोकडे – तीसरा, -आर्या कदम -चौथा, सार्थक चव्हाण – पाचवा, ऋत्विक दुब्बाशी- साहवा,
भव्य पाटील- सातवा, मनन अंबिगा – आठवा
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गंगणे, यशपाल पुरोहित, भक्ती हिंडलगेकर,सोहम हिंडलगेकर, राज कदम,गणेश दड्डीकर,श्री तरलेकर, ऋषीकेश पसारे, आणि इतर यांनी भरपुर परिश्रम घेतले