बेळगाव प्राणी संग्रहालयातील सिंहिणीचा आजाराने मृत्यू
बेळगांव:कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या एका सिंहिणीचा आजाराने मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे निरुपमासाठी वैद्यकीय उपचारांची मदत घेण्यात आली होती. मात्र गुरुवारी दुपारी विश्रांती कक्षात ‘निरुपमा’चा मृत्य झाला . त्यानंतर पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी शवविच्छेदन केले. त् केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निरुपमाच्या मृतदेहाची अंत्यक्रिया करण्यात आली.
या प्रक्रियेदरम्यान संग्रहालयाचे कार्यकारी संचालक मारिया ख्रिस्तू राजा, रेंज वनाधिकारी पवन कुरनिंग, बेळगावचे वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हणमंत सण्णकी,प्रादेशिक संशोधन अधिकारी डॉ. श्रीकांत कोहळ्ळी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश हुइलगोळ उपस्थित होते.