कराटे स्पर्धेत विराज हलगेकर वेदांत हलगेकर यांचे यश.
बेळगाव तारीख 3. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे कराटेपटू विराज विनायक हलगेकर व वेदांत विनायक हलगेकर यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण व कांस्यपदक फटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
गोवा मापसा येते शोटोकॉन कराटे टू संघटना भारत यांच्यावतीने घेण्यात आलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत विराज विनायक हलगेकर यांनी कट्टा सुवर्ण कुमुटेत सुवर्ण तर वेदांत विनय हलगेकर यांने कट्टा व कुमुटे या प्रकारात कांस्यपदक पटकाविले तसेच नुकत्याच बेनकनहळ्ळी येथील ओम कार्यालयात फ्लाईंग फिट स्पोर्ट्स अकादमी आयोजित बेळगाव जिल्हा खुल्या कराटे चॅम्पियनशिप कराटे स्पर्धेत विराजने दोन सुवर्ण तसेच उडपी कराटे बुडोकान फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या केबीकेआय आंतरराष्ट्रीय खुल्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत विराज हलगेकरने कटा व कुमिटे प्रकारात सुवर्णपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
, विराज व वेंदात यांना कराटे प्रशिक्षक आकाश बडगेर यांचे मार्गदर्शन तर संत मीरा शाळेच्या क्रीडा शिक्षिका अनुराधा पुरी शिवकुमार सुतार यांचे मार्गदर्शन व शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार उप मुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी ,शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे ,क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील यांचे व पालक वर्गांचे प्रोत्साहन लाभत आहे.