*हळदी कुंकू व फॅशन शो स्पर्धा उत्साहात संपन्न*
बेळगाव:मकर संक्रांतीच्या निमित्ताने एंजल फाउंडेशनच्या वतीने महिलांकरिता हळदीकुंकू संक्रांति फॅशन शो कार्यक्रमाचे आयोजन १ फेब्रुवारी २०२४ रोजी जय शंकर भवन येथे करण्यात आले होते.
एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी महिलांना हळदीकुंकू लावून वानचे वाटप करण्यात आले. त्यानंतर महिलांनी पारंपारिक वेशभूषा मध्ये तिळगुळ पासून बनलेल्या दागिने परिधान करून फॅशन शो केला. या स्पर्धेमध्ये एकूण 22 महिलांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक दया शिंदे यांनी पटकावले तर द्वितीय पारितोषिक पुष्पा जाधव यांनी पटकावले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ममता आणि सविता यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.