This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2025
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रस्ता अर्धवट का..???? नागरिकांचा प्रश्न* खादरवडीच्या मेन रस्त्याबद्दल तक्रार

*रस्ता अर्धवट का..????  नागरिकांचा प्रश्न* खादरवडीच्या मेन रस्त्याबद्दल तक्रार
D Media 24

बेळगांव:खादरवाडी येथील 2017 -18 या आर्थिक वर्षामध्ये “नम्म ग्राम नम्म् रस्ते” या योजनेअंतर्गत “ग्रामीण अभिरुद्धी आणि पंचायत राज” या कर्नाटक सरकारच्या योजनेअंतर्गत हा रोड मंजूर करण्यात आला. यानंतर ऑक्टोंबर महिन्यामध्ये श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटना खादरवाडी च्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून या रोडची डागडुजी केली होती. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या वर्षासाठी या 1.8KM रोडाच्या डांबरीकरणासाठी फंड मंजूर झालेला असून हा रोड 10/01/ 2025 रोजी अर्धवट करण्यात आला.

गावातील काही राष्ट्रीय पक्षाच्या पुढाऱ्याने या रोडचे उद्घाटन केले त्यावेळेलाच या गावातील पुढाऱ्याने हा रोड इथपर्यंत आहे म्हणून सांगून हा रोड त्या ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्यायचा होता कारण या ठेकेदाराने सरकारकडून पैसे घेतलेले आहेत. हे सर्व श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटना खादरवाडी यांच्या माध्यमातून हे सर्व ओपन करण्यात आलं आणि ठरलेल्या निवेदनानुसार आणि मंजूर झालेल्या योजनेनुसार हा 1.8 किलोमीटरचा रोड पूर्ण करण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटना खादरवाडी या सर्व कार्यकर्त्यांनी आदरणीय जिल्हाधिकारी आणि रुरल रोड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ना लिखित तक्रार दिलेली आहे आणि सात दिवसाच्या आत हे काम पूर्ण करावं नाहीतर रास्ता रोको करण्यात येईल असा सज्जड इसारा देण्यात आला आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.