लोकायुक्त अधिकाऱ्यांकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरावर छापे
बेळगाव: आज सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरावर छापा टाकला. बेकायदेशीर मालमत्ता खरेदी केले असल्याच्या आरोपाखाली लोकायुक्त अधिकाऱ्यांनी हे छापे टाकले आहेत.
बेळगाव लोकायुक्त अधिकारी एस पी हनुमंत राय यांच्या नेतृत्वाखाली दोन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले व त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.बेळगाव उत्तर सब रजिस्टर अधिकारी सचिन मांडेड व पशुवैद्य संजय दुर्गांना यांच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आले.
बेळगाव मधील अनगोळ हारोगेरी व बेल्लाद बागेवाडी या तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. अनगोळ येथे लोकायुक्त सीपीआय निरंजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.