This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बेळगावत इस्कॉनची हरेकृष्ण रथयात्रा शनिवारी: भक्तीरसामृत स्वामी महाराज यांची माहिती*

*बेळगावत इस्कॉनची हरेकृष्ण रथयात्रा शनिवारी: भक्तीरसामृत स्वामी महाराज यांची माहिती*
D Media 24

बेळगावत इस्कॉनची हरेकृष्ण रथयात्रा शनिवारी: भक्तीरसामृत स्वामी महाराज यांची माहिती

बेळगाव-“आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ(इस्कॉन) च्या वतीने 27 वी हरेकृष्ण रथ यात्रा येत्या शनिवार व रविवारी भक्ती पूर्ण वातावरणात संपन्न होणार असून हजारो भक्तगण भाग घेणार आहेत.”अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष प. पू भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना दिली.

इस्कॉनच्या रथयात्रेबाबत बोलताना ते म्हणाले की,
पाटणा येथे सर्वप्रथम इस्कॉनची रथयात्रा सुरू झाली. सुरुवातीला यात्रेमध्ये केवळ शेकडो लोक सहभागी व्हायचे पण त्यानंतर हजारो लोकांचा सहभाग यात वाढला असून आता ही यात्रा जगातील अनेक देशांमध्ये दरवर्षी साजरी केली जाते. भारतामध्ये तर अनेक शहरांमध्ये ही रथयात्रा साजरी होत असून तो त्या त्या शहराचा उत्सव बनत आहे. बेळगावात या रथयात्रेची सुरुवात १९९८ साली करण्यात आली. गेल्या 27 वर्षापासून कोणताही खंड न पडता ही रथयात्रा अखंडपणे सुरू आहे. येथेही सुरुवातीला फक्त शहरातील काही भक्त सहभागी व्हायचे मात्र आता या रथयात्रेचे लोण जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात सगळीकडे पसरले असून देश विदेशातून काही भक्त या रथयात्रेत दरवर्षी सहभागी होत आहेत.

ओरिसाचे जगन्नाथ मंदिर हे चार पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे श्री कृष्णासह श्री हरी विष्णूचा आठवा अवतार, त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची पूजा केली जाते. एकदा सुभद्रादेवीने आपल्या बंधुंना मावशीच्या घरी गुंडीचा येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा भगवान जगन्नाथ व भगवान बलभद्र यांनीही तिच्याबरोबर रथातून जाण्याचे ठरवले आणि तेथे त्यांनी सात दिवस वास्तव्य केले. तेव्हापासून ही यात्रा सुरू असल्याची आख्यायिका ऐकावयास मिळते.
जगन्नाथाचे मुख्य मंदिर ओरिसाची पुरी येथे आहे, जी पुरुषोत्तम पुरी म्हणूनही ओळखली जाते. राधा आणि श्री कृष्णाच्या युगल मूर्तीचे प्रतीक स्वतः श्री जगन्नाथ आहेत. ओरिसामध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या अर्धाकृती मूर्ती स्थापित केल्या आहेत, ज्या इंद्रद्युम्न राजाने बांधल्या होत्या. भगवानांची रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला जगन्नाथ पुरी येथे सुरू होते आणि दशमी तिथीला समाप्त होते.

बेळगावातील यंदाचा रथयात्रा कार्यक्रम-
शनिवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:४५ वाजता धर्मवीर संभाजी चौक (बोगारवेस) येथे भाविकांचा मेळावा, दुपारी १.३० वाजता देश-विदेशातून आलेल्या ज्येष्ठ भक्तांच्या हस्ते आरती व मिरवणुकीला सुरुवात होईल.

रथयात्रा मार्ग – ध. संभाजी चौक, कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडे बाजार, शनिवार खुट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली मार्गे रेल्वे ओव्हर ब्रीजवरुन कपिलेश्वर रोड, एसपीएम रोड, खडे बाजार, शहापूर, नाथ पै सर्कल, बीएमके आयुर्वेदिक कॉलेज रोड, गोवावेस मार्गे इस्कॉनच्या मागे असलेल्या मैदानावर संध्याकाळी ६.३० वा. पोहचल्यानंतर किर्तन, ज्येष्ठ सन्याशांची प्रवचने आणि सर्वांसाठी महाप्रसाद.

रथयात्रेमध्ये सजवलेल्या बैल जोड्या आणि बैलगाड्या भाग घेणार असून भगवद्गीतेवर आधारित विविध प्रसंग दर्शवणारे चित्ररथ सहभागी झालेले असतील. रथयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी होणार असून भाविकांना पाणी, सरबत आणि फळांचे वाटप केले जाणार आहे.
संपूर्ण मार्गावर अतिशय सुंदर अशा रांगोळ्या घातल्या जाणार असून त्यासाठी एक संपूर्ण युनिट कार्यरत आहे.
श्री राधा गोकुलानंद मंदिराच्या पाठीमागील बाजूस भव्य असे मंडप उभारण्यात येत असून तेथे भगवत गीता प्रदर्शन, स्लाईड शो, मेडिटेशन पार्क, गो सेवा स्टॉल, अध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन, युवकांना मार्गदर्शन करणारे स्टॉल राहणार आहेत.

मंदिरास भेट देणाऱ्या सर्वांसाठी दोन्ही दिवस रात्री महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत आहे.
रथयात्रेच्या निमित्ताने अनेक कमिट्या नियुक्त करण्यात आले असून त्या सर्व कमिट्या जोमाने कामास लागल्या आहेत. या पत्रकार परिषदेच्या वेळेला समितीचे अध्यक्ष बालकिशन भट्टड व ज्येष्ठ भक्त एच डी काटवा हेही उपस्थित होते.

रविवारचे कार्यक्रम
रविवार दि.2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०४.३० ते ०५.३० पर्यंत नरसिंह यज्ञ ज्यामध्ये अनेक भक्त सहभागी होतात. ०६.३० ते १० वा. पर्यंत भजन, किर्तन, प्रवचन, नाट्यलिला आणि सर्वांसाठी महाप्रसाद.
वरील सर्व कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.