आयटी विभागाकडून उद्योजक आणि व्यवसायिकांच्या घरावर छापे
बेळगाव: शहरातील काही नामवंत उद्योजकांच्या कार्यालयावर व घरावर आयकर विभागाकडून सकाळ सकाळी छापे टाकण्यात आले. एकाच वेळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे उद्योजक वर्तुळाची झोप उडाली आहे. बेहिशोबी मालमत्ता जमा केलेल्या काही मंडळींना याचा दणका बसला असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेली माहिती अशी की औद्योगिक क्षेत्रातील काही नामवंत उद्योजकांच्या कार्यालयांवर आणि घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. त्यासाठी मंगळवारी सकाळपासून बेंगळुरू आणि गोव्यातील अधिकारी दाखल झाले आहेत. हे अधिकारी संबंधित उद्योजकांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करत आहेत. असे समजले आहे.