बेळगाव: तालुक्यातील बाची व चिरमुरे ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी महादेव मल्लाप्पा गुंजिकर यांची निवड झाल्याबद्दल दलित संघर्ष समिती आंबेडकर वादच्या वतीने संघटनेचे राज्य संघटना संचालक सिद्धप्पा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाअध्यक्ष महांतेश तलवार,सागर कोलकर,आर.जी.कांबळे,राम चव्हाण, संतोष कांबळे, ,सुरेश शिंगे, दीपक सुंटकी, बैरू मैत्री, दीपक धबाडे, कल्लाप्पा नाईक, , शेखर ऐंवर, सिद्दू कुरंगी, फकिरा कुरंगी ,पिराजी कुरी,जीवन कुरणे, भरमांना कांबळे, नींगाप्पा कांबळे,नामदेव बाचीकर उपस्थित होते.