बाळंतिणीसह कुटुंबाला घराबाहेर काढून घर केले जप्त
बेळगांव:कर्जाचे हप्ते भरले नाहीत म्हणून खासगी फायनान्स कंपनीने एक महिन्याच्या बाळंतिणीसह कुटुंबाला घराबाहेर काढून घर जप्त केल्याची संतापजनक घटना बेळगाव जिल्ह्यातील तारीहाळ गावात घडली आहे.
महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मतदार संघात ही घटना घडली आहे.
बेळगाव जिल्हयात एका महिन्यात अशा तीन घटना घडल्या आहेत.घर बांधण्यासाठी गणपती रामचंद्र लोहार याने पाच वर्षापूर्वी पाच लाखाचे कर्ज ॲप्टस व्हॅल्यू हौसिंग फायनान्स इंडिया लि.कडून घेतले होते.आईचे आजारपण आणि अन्य कारणांमुळे गेल्या सहा महिन्यांपासून गणपती याला कर्जाचे हप्ते भरता आले नव्हते.त्यामुळे खासगी फायनान्स कंपनीने कोर्टात दावा दाखल करून घर जप्तीचा आदेश मिळवला होता.
आदेश मिळाल्यावर वकील आणि पोलिसांच्या उपस्थितीत फायनान्स कंपनीने घराला टाळे ठोकले.सुतार कुटुंबीयांना यावेळी घरातील वस्तू देखील घेण्यास कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मज्जाव केला.त्यामुळे सुतार कुटुंबीय घराच्या समोर शेड उभारून राहत आहेत.