बेळगांव:राष्ट्रीय कराटे चॅम्पियनचा मान पटकावलेल्या मास्टर विराज लाडचा मराठा मंडळ हायस्कूल बेळगाव व २५ व्या एनसीसी बटालियनच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी उपप्राध्यापक श्रीमती एल.एन. शिंदे एनसीसी ऑफिसर एल जे पाटील व २५ व्या एनसीसी कर्नाटका बटालियनचे हवालदार बिपडे गौस,नायक श्री दीपक सिंग याप्रसंगी उपस्थित होते. विराजला कराटे प्रशिक्षक श्री विठ्ठल बोजगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.