भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
खानापूर : हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स यांच्यावतीने 25 जानेवारी रोजी भव्य हाफपीच सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा क्रिकेट संघानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून युवा स्पोर्ट्स यांच्यावतीने क्रिकेट स्पर्धेसह विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असून हाफपीच क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला १५ हजार रुपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला 7500 रुपये व आकर्षक चषक तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजसाठी आकर्षक चषक दिला जाणार आहे. ही स्पर्धा एक गाव एक संघ तसेच खानापूर शहरासाठी दोन प्रभाग एक संघ याप्रमाणे खेळविली जाणार आहे.
तसेच स्पर्धा दोन दिवसांची असल्याने आगाऊ नोंदणी व प्रथम आलेल्या संघांना प्राध्यान्य देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी मिलिंद देसाई (7760688710) किंवा राजन सुतार (8139901919) या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.