दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराला दिली उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी भेट
कर्नाटकचे उप मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी बेळगावातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कपिलेश्वर मंदिरात पूजा ,अभिषेक केला.सध्या डी.के.शिवकुमार बेळगावात काँग्रेस पक्षाच्या जय बापू,जय भीम आणि जय संविधान कार्यक्रमाच्या निमित्ताने बेळगावात आहेत.सध्या कर्नाटकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी शिवकुमार यांचे विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्री सतीश जारकी होळी यांनी केली आहे.त्यातच काही दिवसापूर्वी बंगलोर मध्ये झालेल्या काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत देखील शिवकुमार आणि जारकीहोळी यांच्यात वाद झाला होता.
त्यातच काही आमदार दुबई दौऱ्यावर गेले आहेत.या साऱ्या पार्श्वभूमीवर उप मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी सध्या टेम्पल रन सुरू केले आहे.कर्नाटकातील जागृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक मंदिरात त्यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून पूजा अर्चा केली आहे.बेळगावात श्री कपिलेश्वर मंदिरात देखील त्यांनी महादेवाला एकशे अकरा लिटर दुधाचा आणि पंचामृताचा अभिषेक करून प्रार्थना केली आहे.