ॲपटेकच्या ७ विद्यार्थ्यांची दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी निवड
बेळगाव: मुलांनी कधीही आपल्या आई वडिलांचे उपकार विसरू नये आपण कितीही मोठे झालात तरी सर्वप्रथम आई-वडिलांनाच आदर आणि प्रेम करणे गरजेचे आहे.आपल्या मुलांना घडवण्यासाठी आई-वडील काबाड कष्ट करत असतात. त्यांनी केलेल्या त्याग विद्यार्थ्यांनी विसरू नये असे ॲपटेक एव्हिएशनच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना माजी आमदार संजय पाटील म्हणाले.
ॲपटेक एव्हिएशन आणि हॉस्पिटल अकॅडमी येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ७ विद्यार्थ्यांची दिल्ली येथील इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हीआयपी ग्राउंड आय जी आय एअरपोर्ट दिल्ली येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आली. यानंतर माजी आ संजय पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महम्मद अली खान,जुने सनदी, सुमित कोटेकर, आरती गौडा, समीक्षा पाटील, सोनू माहेश्वरी, मधु सूदन, अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
याप्रसंगी ॲपटेक एव्हिएशन आणि हॉस्पिटल अकॅडमीचे व्यवसायिक भागीदार विनोद बामणे, सरस्वती इन्फोटेकच्या एमडी ज्योती बामणे, व्यवस्थापक फैजल सर यांच्यासहित विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.