This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना वाहण्यात श्रद्धांजली*

*खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना वाहण्यात श्रद्धांजली*
D Media 24

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना वाहण्यात श्रद्धांजली

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना आज गांभीर्याने श्रद्धांजली वाहण्यात आली 1956 मध्ये भाषांतर प्रांत रचना झाली त्यावेळी मुंबई प्रांतात असलेला एक मोठा मराठी बहुभाषिक असलेला भूभाग अन्यायाने कर्नाटकाला जोडून मराठी भाषिकावर केंद्र सरकारने अन्याय केला.

या विरोधात मराठी भाषिकांचा उद्रेक होऊन बरेच मोठ मोठी आंदोलने रास्ता रोको साराबंदी असे उठाव झाले यावेळी या उठावात बेळगाव व खानापुरातील मराठी भाषिकांना हुतात्मे पत्कराव लागल त्या दिवशीपासून 17 जानेवारी हा हुतात्मा दिवस म्हणून पाळत आलेलो आहोत यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी सहदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सीमा प्रश्नाचा हा जागर खानापूर तालुक्यामध्ये सुरू आहे जोपर्यंत हा संपूर्ण मराठी प्रदेश महाराष्ट्र मध्ये सामील होत नाही तोपर्यंत ही आंदोलने अशीच सुरू राहणार आपली मराठी संस्कृती आपली मराठी परंपरेबरोबर मराठी शाळा टिकवण्यासाठी येणाऱ्या पिढीला आपल्या समवेत घेऊन संघर्ष करून हुतात्म्यांच महाराष्ट्रात जाण्याचा स्वप्न पूर्ण करायच आहे.

यावेळी खानापूर तालुका पंचायत चे माजी सभापती श्री सुरेश देसाई यांनी हुतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करून कायम समितीच्या कार्यात कार्यरत राहून हा सीमा प्रश्न सोडवल्यानंतर हुतात्म्याला खरी श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे असे आपले मत व्यक्त केले यावेळी खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील सचिव राजीव पाटील ज्येष्ठ नेते पीएच पाटील बळीराम पाटील गोपाळ गुंजकर गजानन पाटील उपस्थित होते


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.