कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेत पालकांसाठी आरोग्य शिबिर संपन्न
मुलांच्या जडणघडणीत पालकांचे योगदान महत्त्वाचे असून उत्तम आरोग्य असलेले पालकच मुलांना सर्व प्रकारे सहकार्य करून मुलांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचण्यास मदत करू शकतात या उद्देशाने कॅन्टोनमेंट शाळेच्या पालकांसाठी शहरातील लोटस हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिरात डॉ.अमर पाटील हाडाचे तज्ञ,डॉ. रेणुकाराध्य पाटील हाडाचे तज्ञ, डॉ.अनिल पाटील गायनोकोलॉजिस्ट,डॉ. सतीश कुगजी,डॉ. प्राप्ती पाटील दंत तज्ञ या तज्ञ डॉक्टरांसह लोटस हॉस्पिटलचे ऍडमिनिस्ट्रेटर किशोर केरकर, कॅन्टोनमेंट हॉस्पिटलचे आर. एम. ओ.डॉ.रवींद्र अनगोळ, डॉ. राजश्री अनगोळ व इतर वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.आरोग्य तपासणी करून पालकांना मोफत औषधे पुरवण्यात आली.
या आरोग्य शिबिरात 200 पेक्षा जास्त पालकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
या आरोग्य शिबीरासाठी कॅन्टोनमेंट बोर्डाचे सि. ई. ओ. राजीव कुमार यांचे मार्गदर्शन लाभले तर आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.