कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेत आठवडी बाजाराचे आयोजन.
खरेदी-विक्री,नफा-तोटा या संकल्पनेचे मुलांना प्रत्यक्षात ज्ञान व्हावे या उद्देशाने कॅन्टोनमेंट प्राथमिक शाळेमध्ये आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील पाचवी,सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यानी भाजीपाला,फळे, खाऊचे पदार्थ इत्यादी वस्तू आणून मोठ्या प्रमाणावर विक्री केली.सर्व पालकांना आपल्या घरातील भाजीपाला एक दिवस या विद्यार्थ्यांकडून खरेदी करून मुलांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत खरेदीदार म्हणून शाळेचे पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कॅन्टोनमेंट हॉस्पिटलचे आर.एम. ओ. डॉ.रवींद्र अनगोळ,डॉ.राजश्री अनगोळ,जायन्ट सखीच्या सुलक्षणा शिंदोळकर,फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर,श्रीकांत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. सुलक्षणा शिंदोळकर यांनी शालेय ग्रंथालयासाठी आठ हजाराची पुस्तके भेट दिल्याबदल शाळेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन त्यांची व उपस्थित पाहुण्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.मोठ्या प्रमाणावर खरेदीदार मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॅन्टोनमेंट बोर्डाचे सी. ई. ओ.श्री राजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक पी.एस.बिर्जे, यू. एस.पाटील,डी. ए.कुरणे, श्रीकांत काटकर,मनीषा वड्डगोळ, तुषार कांबळे,राहुल कांबळे,रेणुका बागडी या शिक्षकांनी परिश्रम घेतले.