गांजा ने घेतला एकाचा बळी, दुसरा जखमी
बेळगाव : गांजा ओढण्यावरून दोघा भावंडांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणाचे पर्यवसान दोघेही भाऊ तोल जाऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले . या दुर्घटनेत एक जण जागीच ठार झाला तर दुसरा दोन्ही पाय तुटून गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील निलजी गावामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा घडली.
जागीच मृत्युमुखी पडलेल्याचे नांव सुशांत सुभाष पाटील (वय 20, रा. निलजी) असे असून त्याचा मोठा भाऊ ओंकार सुभाष पाटील (वय 23, रा. निलजी) हा गंभीर जखमी झाला आहे.
त्याला उपचारासाठी बेळगाव येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, सुशांत व ओंकार या दोघांना गांजाचे व्यसन होते. व्यसनाधीन झालेले हे दोघे घरातील कामांकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे पालकांकडून त्यांना सतत बोलणे खावे लागत असे. शुक्रवारी रात्री देखील घरातील कामे करत नसल्याबद्दल पालकांनी दोघांनाही चांगलाच दम दिला.
त्यानंतर काम कोण करणार यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. मग दोघेही गांजा ओढण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर गेले गांजा ओढण्यावरून झालेल्या वादात दोघांचा तोल घसरून इमारतीवरून दोघेही खाली पडले. त्यामध्ये सुशांतचा जागीच मृत्यू झाला तर ओमकारचे दोन्ही पाय गेले.या घटनेची माहिती मारीहाल पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.