राउडी शीटरवर गोळीबार करून हत्या करण्याचा प्रयत्न
बेळगाव: शाहूनगर येथील रहिवासी राउडी शीटर प्रफुल पाटील यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
बेळगाव तालुक्यातील गणेशपुर परिसरात घटना घडली आहे. बेळगुंदी गावातून आपल्या घरी जात असताना अपरिच व्यक्तींनी गोळीबार केला.
चालत्या गाडीवर गोळीबार करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोळी गाडीच्या काचेला लागून प्रफुल पाटील यांचे प्राण वाचले.कार गाडीची काच कुठून चेहऱ्याला व डोक्याला दुखापत झाली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहे. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये घडली आहे.