राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे “स्कूल कनेक्ट अभियान” उत्साहात साजरा
नव शैक्षणिक धोरणाचे उद्गगाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज – प्रा. मधुकर जाधव
शिनोळी बु. ( रवी पाटील): राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे “स्कूल कनेक्ट अभियान 2024-25” अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि कौशल्य आधारित शिक्षणावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक एन. टी. भाटे यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी येथील इतिहास अभ्यासक डॉ. प्रा. मधुकर जाधव आणि गणित प्राध्यापक प्रा. एस. आर. वायकर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून प्रा. जे. पी. कांबळे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. मुख्याध्यापकांनी मान्यवरांना गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. डॉ. मधुकर जाधव यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना याच्या महत्त्वपूर्ण तरतुदी आणि त्याचा अभ्यासक्रमावर होणारा प्रभाव समजावून सांगितला. प्रा. वायकर यांनी अभ्यासक्रमा बरोबर जीवन कौशल्य आणि त्याच्या उपयोगितेवर विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी प्रभावीपणे केले, तर विक्रम तुडयेकर यांनी आभार प्रदर्शन केले. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांची उत्स्फूर्त उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.