बेळगांव:बसवण कुडची येथे समाजसेवक परशराम बेडका व हिरेमठ ग्रुपने स्पॉन्सर केले होते.यांच्या सहकार्यांने बसवण कुडची प्रेमियर लीग टोर्नामेंटचे आयोजन केले होते.
पहिला फलंदाजी करत जिटीएम (गजानन तरुण मंडळ )स्पोर्ट्स ने 5 शटकात 53 रन्स काढून टायगर क्रिकेटर्सला आवाहन केले होते.
किरण शंकरगौडा याने संपूर्ण टूर्नामेंट मध्ये 101 रन काढून मॅन ऑफ दि मॅचचा चषक पटकावला तर लकी मुचंडीकर यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले.रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना जिटीएम स्पोर्ट्सने 5षटकात 52धावा केल्या होत्या.जिटीएम स्पोर्ट्स चा कर्णधार लकी मुचंडीकर ने एकाकी लढत देताना धावांचा डोंगर रचला होता.टायगर क्रिकेटर्स चे किरण शंकरगौडा याने 5बॉल 5चौकार मारत मॅच आपल्या पारड्यात खेचून आणली. टायगर क्रिकेटर्स ला 6बॉल मधे 3 रण ची आवशकता होती.
अंतिम षटकात एक बॉल एक रनच्या वेळी संजूने एक धावा करत मॅच जिंकून दिली. सामना अतितटीचा झाल्याने क्रिकेट प्रेमिनी चांगलाच आनंद घेतला.एस व्ही जे संघाने तिसरा क्रमांक मिळवून समाधान वेक्त केले. महेश ईटगेकर व राजु चौगुले यांनी समालोचन व स्वागत, तसेच आभार मानले. माजी आमदार अनिल बेनके, समाजसेवक परशराम बेडका, राजशेखर हिरेमठ, शंकर रवळूचे यांच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आले.यावेळी परशराम बेडका, बसवंत कौलगी, यल्लाप्पा मुचंडीकर, संभाजी गिरी, जोतिबा मुतगेकर, डॉ अमित हम्मनावर, अभय कित्तूर,बाबू बेडका, बाळू बेडका,यल्लाप्पा हलगेकर, कृष्णा दिवटे,विश्वनाथ बडिगेर, संजू बडिगेर,भरमू वंडरोटी,सुनील गिरी.वसंत तारिहाळकर व गावातील क्रिकेट प्रेमी उपस्थिती होते.