शहापूर शिवारातील दहा एकर उसाला आग लागून ऊस भस्मसात झाला.विजेच्या खांबावरील तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडल्याने ही आग लागली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.शेताच्या जवळ असणाऱ्या वीज खांबावरील तारांचे घर्षण होऊन ठिणगी ऊसात पडली आणि उसाने पेट घेतला.ठिणगी पडली त्यावेळी वारा जोरात असल्याने लगेचच आग उसाच्या शेतात पसरली.
बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि दहा एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला.आग लागल्याचे वृत्त अग्निशामक दलाला कळवल्यावर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझविली.पण तो पर्यंत सगळा ऊस जळून खाक झाला होता.काही दिवसात ऊस तोडून कारखान्याला पाठवण्यात येणार होता पण त्यापूर्वीच ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.