बेळगाव : घटप्रभा नदीमध्ये कार कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हुक्केरी तालुक्यातील बेनकोळी गावाजवळ ही घटना घडली.मारुती इक्को कारने यमकनमर्डीहुन बेळगावच्या दिशेने जात असताना कार नदीच्या पाण्यात पडली कार मध्ये अडकून किरण नामक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेली माहिती अशी की नदीमध्ये गाडी मंगळवारी सायंकाळी किंवा सकाळी पडल्या असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. किरण हा हुक्केरी तालुक्यातील दड्डी गावातील व्यक्ती असल्याची माहिती मिळाली आहे.घटनास्थळी यमकनममर्डी पोलिसांनी धाव घेऊन मारुती इक्को नदी बाहेर काढण्यात आले.