पहिला दिवस ऑस्ट्रेलिया फलंदाजांचा
चौथी कसोटी, दिवस पहिला
मेलबर्न:
येथील एमसीए ग्राउंड वर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अंतर्गत चौथी कसोटी गुरुवारपासून खेळवण्यात येत आहे. कसोटी चा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गाजवला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पहिल्या दिवशी पहिल्या डावात 6 बाद 311 अशी भक्कम धावसंख्या उभारली आहे. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण केलेल्या सॅम कोन्सटास यांने पहिल्याच कसोटी सामन्यांमध्ये दमदार अर्धशतक झळकवले. त्याने 65 चेंडू मध्ये 60 धावांची खेळी केली. यामध्ये दोन उत्तुंग षटकार आणि सहा खणखणीत चौकार खेचले. त्याला रवींद्र जडेजा ने पायचीत बाद करून पॅवेलियनचा रस्ता दाखवला.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांच्या पहिल्या डावाची सुरुवात कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा या दोघांनी चांगली केली.
धावफलकावर 89 धावा लागल्या असताना ऑस्ट्रेलियाला कोन्टास रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मारनेस लाबूसेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी महत्वपूर्ण 65 धावांची भागीदारी केली.
उस्मान ख्वाजा जसप्रीत बुमराहची शिकार ठरला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर याने मारनेस लाबूसेन याला बहात्तर धावांवर बाद करून पॅवेलियनमध्ये पाठवले. जसप्रीत बुमराह याने ट्रॅव्हीस हेड याला शून्यावर बाद केले. तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली.
मीचेल मार्श 4 धावांवर बाद झाला. ॲलेक्स केरी 31 धावा करून तंबूत परतला. पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 86 षटकांमध्ये 6 बाद 311 अशा भक्कम धावा केल्या होत्या. कमिन्स आठ धावांवर तर स्टीव्ह स्मिथ 68 धावांवर नाबाद खेळत आहेत.
शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना झटपट चार विकेट घेण्याची गरज आहे. जर सेट झालेला फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि कमिन्स यांनी चांगली फलंदाजी केली तर भारताला ते डोकेदुखी ठरू शकतात.
भारतातर्फे जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 75 धावा देऊन तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा ,वाशिंग्टन सुंदर आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.
4484 चेंडूनंतर जसप्रीत बुमराहला षटकार
ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या सॅम याने पहिल्याच सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराला षटकार खेचला. तब्बल 4484 चेंडू नंतर बुमराह याला षटकार खेचण्यात आला आहे. कसोटी क्रिकेट इतिहासामध्ये फक्त सहाच फलंदाजानी बुमराह याला षटकार मारला आहे. त्यात आता सॅम चार नव्याने समावेश झाला आहे.
एमसीजी वर सर्वात अधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह 18 विकेट, अनिल कुंबळे 15 विकेट, कपिल देव आणि आर अश्विन प्रत्येकी 14 विकेट.