बॉक्सिंग डे कसोटीसाठी
भारत तयार
मेलबर्न:
येथील क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथी बॉक्सिंग डे कसोटी 26 पासून सुरू होणार आहे. या कसोटीसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला मेलबर्न आणि सिडनी येथील दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. यापूर्वी पर्थ येथे झालेला पहिला कसोटी सामना भारतीय संघाने 295 धावांनी जिंकला होता. मालिकेमध्ये एक शून्य अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक करत दुसरी कसोटी तब्बल दहा गड्यांनी जिंकली होती. त्यामुळे पुन्हा मालिकेमध्ये एक एक अशी बरोबरी झाली होती. तिसरी कसोटी अनिर्णित राहिली होती. त्यामुळे आता चौथ्या बॉक्सिंग डे कसोटीवर दोन्ही संघांची नजर आहे.
चौथ्या कसोटी आधीच भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय सामन्यामधून आपली निवृत्ती घोषित केलीआहे. त्याची उणीव भारतीय संघाला नक्कीच जाणवेल. मालिकेमध्ये आघाडी घेण्यासाठी दोन्ही टीम उत्सुक आहेत. भारताने ही कसोटी जिंकली तर भारतीय संघाचे मनोबल उंचावणार आहे. त्याचा फायदा डब्ल्यूटीसीच्या पॉइंट टेबल मध्ये होणार आहे. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू तनिष कोटीयन याला टीम इंडियामध्ये सामील करण्यात आले आहे. त्याला प्लेइंग इलेव्हन मध्ये जागा मिळेल की नाही हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
या मालिकेमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि एक डाव वगळता विराट कोहली पूर्णपणे असफल ठरले आहेत. त्यांच्याकडून जबरदस्त कामगिरीची अपेक्षा आहे. या दोघांप्रमाणेच शुभमन गिल आणि अन्य खेळाडूंची कामगिरी चांगली झाली तर भारतीय संघाचा विजय दूर नाही. एकंदरीत चौथ्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे.