बेळगांव: तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावातील श्री महालक्ष्मीदेवीच्या वाढदिवसानिमित्त बाल तरुण युवक मंडळ, बाहेर गल्ली यांच्यावतीने शनिवार दि.२८ रोजी भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे.सदर मैदानात जोडपाहून कुस्ती नेमण्यात येणार आहे. तरी परिसरातील मल्लांनी या मैदानाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी कुस्ती कमिटी रात्रंदिवस परिश्रम घेत आहे. कुस्ती मैदानासाठी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. कुस्ती प्रेमींना कुस्ती पाहता यावी यासाठी कमिटीच्या वतीने आकर्षक आखाडा तयार करण्यात आला आहे. याचा हौशी कुस्ती शौकिनांनी अवश्य लाभ घ्यावा , असे आवाहन कुस्ती कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.