गांधी भारत कार्यक्रमांतर्गत शाळांना २ दिवसाठी सुट्टी जाहीर
बेळगाव: “गांधी भारत १००” या कार्यक्रमांतर्गत बेळगाव शहरांमध्ये २६,२७,२८ डिसेंबर रोजी तीन दिवस मोठा कार्यक्रम काँग्रेस सरकारच्या वतीने घेण्यात येणार आहे. याकरिता बेळगाव जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी दोन दिवसाची सुट्टी बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जाहीर केली आहे.
“गांधी भारत १००” या कार्यक्रमानिमित्त शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ राहणार असल्याने याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळांना दोन दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना ये जा करण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये या उद्देशाने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.