बेळगांव:अनगोळ ग्रामदेवता पैकी एक असलेले असे भैरवनाथ मंदिर थोडक्यात या मंदिराचा इतिहास सांगायचं म्हणजे आपले पूर्वज सांगतात की पूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरायची यानिमित्त देवाला बकरी व कोंबड्यांचा बळी देत असत तसेच या मंदिराच्या जीर्णोद्धार बाबत सांगायचे म्हटलं पूर्वज म्हणत होते की या मंदिराचा जिर्णोद्धार करायचा असेल तर एका रात्रीमध्ये तो जिर्णोद्धार करायचा त्यामुळे बऱ्याच कालावधीपासून या मंदिराचा जिर्णोद्धारही झालेला नाही.
यात्रा सुद्धा भरवण्यात आलेली नाही तर आता सिद्धिविनायक साप्ताहिक फंड लोहार गल्ली या कमिटीने असा एक निर्णय घेतला की उन्हात व पावसात असलेल्या देवस्थानासाठी काहीतरी एक आसरा असावा आलेल्या भक्तांना व्यवस्थितपणाने पूजा करता यावी कोणतीही अडचण येऊ नये तसेच दिवा सतत पेटत रहावा व नवरात्री सनामधे दिवा तेल सतत या ठिकाणी राहावा.
या दृष्टिकोनातून श्री सिद्धिविनायक साप्ताहिक फंडच्या कमिटीने 21 बाय 21 असे एक पत्र्याचे शेड निर्मिती करून या मंदिराच्या जिर्णोद्धार चालना दिलेली आहे. हे काम करताना वरिष्ठ पुरोहितांना या बाबतीत माहिती देऊन त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती घेऊन या कामाला चालना दिलेली आहे. त्यानिमित्त त्या पुरोहितांकडून भूमिपूजन करून मंदिराच्या जीर्णोद्धाराला चालना देण्यात आली.गल्लीतील पंचमंडळी तसेच सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते. या कामाकरिता एक कमिटीची रचना करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. व पुढील जिर्णोद्धार मोठ्या प्रमाणात व्हावा आणि जिर्णोद्धारासाठी गावातील दानशूर व्यक्तीने पुढे येण्याचे आव्हान करण्यात आले.
याप्रसंगी सिद्धिविनायक फंडचे पदाधिकारी सागर लोहार,भावेश ताशिलदार,आकाश सुनगर, संदेश कालखंबकर,तसेच गल्लीतील पंचमंडळी रमेश खाणूकर,संदीप खनुकर,संतोष पुजारी,अक्षय सावंत,आनंद ताशिलदार,लक्ष्मण तशिलदार,विनायक लोहार,मुरलीधर लोहार,बाळू पाटणेकर,रमेश कलखांबकर,परशराम लोहार, बाबू सुनगार,उदय पाटील,सचिन कलखांबकर,लक्ष्मण धामणेकर ,चेतन खेळणेकर,आकाश खणूकर, मोहन सुनगर, प्रकाश तशीलदार, बसवराज सुनगर,पवन लोहार,नामदेव खेळणेकर यांच्यासहित गल्लीतील कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.