बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल यांचा करण्यात आला सत्कार
बेळगाव: नुकताच झालेल्या मराठा को-ऑपरेटिव बँक मधून अशोक कांबळे संचालक पदी तर पोईनर अर्बन बँक मधून मल्लेश चौगुले संचालक पदी निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या व यांचा सत्कार कार्यक्रम शहरातील आंबेडकर उद्यान येथे पार पडला.
प्रथमता डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
युवा आघाडीचे नेते भाऊराव गडकरी व दलित संघर्ष समितीचे राज्य संघटना संघटक सिद्धाप्पा कांबळे , बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या वतीने अशोक कांबळे व मल्लेश चौगुले यांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार केला.